वाशिम: मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात निलगाय ठार झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात घडली. शनिवारी गोलवाडी येथेही कु त्र्याने हल्ला केल्याने निलगायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. एकाच दिवसांत दोन निलगायीचा मृत्यू झाला असताना वनविभागाकडून मात्र या दोन्ही वन्यजीवांच्या मृत्यूची दखल घेण्यात आली नाही.
गतवर्षीच्या अपुºया पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील जंगलातील बांध, तलाव आटले असून, चाराही संपल्याने चारापाण्यासाइी वन्यप्राणी लोकवस्तीकडे धाव घेत असून, शनिवारी गोलवाडी शिवारात एक निलगाय पाण्याच्या शोधात गावात घुसला होता. त्यावेळी कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या संदर्भात वनविभागाला माहिती देऊन त्या निलगायीचा जीव वाचविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यामुळे तो रोही ठार झाला, त्यानंतर आसेगाव परिसरातही चारापाण्याच्या शोधात भटकत असलेल्या निलगायीचा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे या दोन्ही निलगायीचा जीव वाचविण्याचे प्रयत्न वनविभागाकडून झाले नाहीच शिवाय या निलगायीच्या मृतदेहाची रितसर विलहेवाटही लावण्याचे प्रयत्न करण्यात आले नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकाºयांची दिरंगाई वन्यजीवांसाठी घातक ठरत असल्याने आता वरिष्ठस्तरावरील अधिकाºयांनीच या प्रकाराची दखल घेऊन चौकशी करणे आवश्यक झाले आहे.