लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या १४ तारखेपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. आज प्राप्त अहवालानुसार पुन्हा नव्याने १९० कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले असून त्यातील ११४ रुग्ण एकट्या मालेगाव तालुक्यातील आहेत. दरम्यान, ४ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कारंजातील ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.५ मार्च रोजीच्या अहवालानुसार वाशिम शहरातील पाटणी चौक, काटा रोड, ईश्वरी कॉलनी,पोलीस स्टेशन, चंडिकावेस, पुसद नाका, विनायक नगर, सामान्य रुग्णालय परिसर, जुनी नगर परिषद परिसर, तामसी, हिवरा येथील प्रत्येकी एक, काळे फाईल, सिव्हील लाईन्स, गवळीपुरा, सायखेडा, तोंडगाव, तोरणाळा, धानोरा मापारी येथील प्रत्येकी दोन, मोहजा रोड येथील चार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रिसोड तालुक्यात शहरातील तीन व नावली येथे एक, मंगरूळपीर तालुक्यात शहरातील सुभाष चौक, अशोक नगर, राजस्थानी चौक, प्रगतीनगर, नवीन सोनखास, बेलखेड, हिसई, शहापूर, पोघात, शेंदूरजना, वनोजा, माळशेलू येथील, बोरवा आणि रामगड येथील प्रत्येकी एक, वाडा फार्म येथील ४, शेलूबाजार येथील ३, मोहरी, पेडगाव, गोलवाडी येथील प्रत्येकी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. तसेच कारंजा तालुक्यात नागरवाडी, मनभा, बेंबळा येथे प्रत्येकी एक, धनज बु., धनज, राहटी, उंबर्डा बाजार येथे प्रत्येकी दोन; तर कामठवाडा येथे तीन नवे रुग्ण आढळले. मालेगाव शहरात नगरपंचायत जवळ ४, गांधी चौक येथे ३, माळी वेटाळ येथील ४, शिक्षक कॉलनी येथील ३, देशपांडे प्लॉट येथील ३, वार्ड क्र. १० येथे ३, गांधी नगर येथे ५, शेलू फाटा येथील २, अकोला फाटा येथील ५, दुर्गा चौक येथील ५, सोनारगल्ली येथील २, सहारा पार्क येथील २, नागरतास येथील २, इराळा येथील २, माहेश्वरी भवन, वार्ड क्र. १६ , शिव चौक, जाटगल्ली, वार्ड क्र. ८, कोर्टासमोरील परिसर, गोकुळधाम, टिपू सुलतान चौक, वार्ड क्र. १, बियाणी नगर, पांडे वेटाळ, तेली वेटाळ, मुंगसाजी नगर , सिद्धेश्वर कॉलनी, गीता नगर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, पाण्याची टाकीजवळ, मर्कस मस्जिद , दत्त मंदिर , वार्ड क्र. ४ , सराफा गल्ली , वार्ड क्र. १७ , महसूल कॉलनी , जामा मस्जिद परिसर , गणपती मंदिर परिसर, गोयंका नगर, दुधाळा, मारसूळ , जांभरूण परांडे, पांगरी, डही, बोरगाव, कुराळा, आमखेड, अमानी, बोर्डी, शिरपूर, डोंगरकिन्ही , पांगराबंदी, बोराळा येथील प्रत्येकी एक तर शहरातील इतर ठिकाणचे १८, वडप येथील २, जऊळका येथील ८ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.(प्रतिनिधी)
कोरोनामुळे एकाचा मृत्यू; नव्याने आढळले १९० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 11:55 AM