शहरं
Join us  
Trending Stories
1
"वंदे मारतमरला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं"; राऊत म्हणाले, "फडणवीस कुठेत?"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत
3
"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती?
4
बहराइच हिंसाचार: नखं उपटली, करंट लावला आणि... रामगोपालची छळ करू हत्या, धक्कादायक माहिती समोर   
5
Lionel Messi नं साधला मोठा डाव; Cristiano Ronaldo च्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
6
एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...
7
महाविकास आघाडीने केले  २१५ उमेदवार निश्चित! काँग्रेसला ८४, शरद पवार गट व उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा
8
Baba Siddique : YouTube वर व्हिडीओ पाहिले, पिस्तूल चालवायला शिकले; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवा खुलासा
9
Video - "मी तुम्हाला मत दिलं, आता माझं लग्न लावून द्या..."; कर्मचाऱ्याने थेट आमदारालाच सांगितलं
10
Kojagiri Purnima 2024: कोजागरीच्या रात्री कशी करावी लक्ष्मी आणि चंद्राची पुजा? शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या!
11
"शिंदेंना CM करायचे नाही"; BJP ने हकालपट्टी करताच माजी आमदार म्हणाले, "आता कॉम्प्रमाईज..."
12
गजकेसरी महालक्ष्मी योग: ८ राशींना बंपर लाभ, शेअर बाजारात नफा; दिवाळीत ऐश्वर्य-वैभव वृद्धी!
13
BSE Ltd च्या शेअरमध्ये मोठी घसरण, 'या' दिग्गज ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; म्हणाले...
14
kojagiri Purnima 2024: कोजागरीला 'कोss जागर्ति' म्हणत लक्ष्मी माता खरंच येते का? वाचा जागरणाचे महत्त्व!
15
सोलार कंपनीचा IPO येणार, GMP मध्ये आतापासूनच ₹१२८० चा फायदा; काय आहे प्राईज बँड?
16
IND vs NZ : बंगळुरुमध्ये पावसाची बॅटिंग; पहिल्या दिवसाचा खेळ पाण्यात?
17
Hyundai IPO कडे गुंतवणूकदारांची पाठ, पहिल्या दिवशी १८% सबस्क्राईब; काय करावं?
18
राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला, असा आहे निवडणूक कार्यक्रम; दिवाळीच्या आधी आणि नंतरही वाजणार प्रचाराचे फटाके
19
नांदेड, वायनाडसाठी हाेणार पोटनिवडणूक; विधानसभेच्या ४८ जागांसाठीही लढत
20
आजचे राशीभविष्य : आज आर्थिक व्यवहार टाळावेत, अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता

मालेगावात कर्ज मेळावा

By admin | Published: March 23, 2017 2:11 AM

सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.

मालेगाव (वाशिम), दि. २२- प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी जनजागृती म्हणून प्रत्येक तालुक्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे घेण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात मेळावा घेण्यात आला असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.मेळाव्याला नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडारे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, तहसीलदार रवी राठोड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर धारगावे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. यावेळी विजय खंडारे म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बेरोजगार युवकांना सहज व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरु होऊन बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज बँकेकडे सादर करावा. त्यानंतर सदर बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील व त्यानुसार कर्ज मंजूर करण्यात येईल, असे खंडारे यांनी स्पष्ट केले.नगराळे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज प्रकाराबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी मालेगावचे तहसीलदार राठोड यांनी प्रास्ताविकामध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू विषद केला. मालेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांपयर्ंत प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती पोहोचावी व त्याद्वारे तालुक्यात नवीन उद्योग, व्यवसाय सुरु होण्यास मदत व्हावी, हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वैद्य, धारगावे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन मंडळ अधिकारी सुनील लोखंडे यांनी केले.कारंजा येथे आज मेळावा२३ मार्च रोजी कारंजा तहसीलदार कार्यालय परिसरात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सुशिक्षित बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.