लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत विशिष्ट क्रमांकासह जिल्ह्यातील ८३ हजार ६३४ शेतकºयांची दुसरी यादी २९ फेब्रुवारी रोजी संबंधित गावांमध्ये प्रसिद्ध झाली. गत १२ दिवसांत जिल्ह्यातील सुमारे ६८४०१ हजार शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले असनू, संबंधित शेतकºयांना प्रमाणपत्रही देण्यात आले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकºयांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण केले जात आहे. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत ८३ हजार ६३४ शेतकºयांचा समावेश असून, आधार प्रमाणिकरण केले जात आहे. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या शेतकºयांना आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. आधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. १२ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ६८४०१ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)
कर्जमुक्ती योजना; ६८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:13 PM