लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकर्यांना कर्जमाफी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईपर्यंंत शासनाने थकबाकीदार शेतकर्यांना तातडीने १0 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी दुपारी तातडीने कृषी विभाग, सहकार विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेत सोमवारपासून दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, अकोला जिल्हा बँकेच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात १0 हजारांचे कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकर्यांना दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणारी अकोला जिल्हा सहकारी बँक ही पहिली बँक ठरली आहे.अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या अकोला शाखेमध्ये अकोल्याचे पालकमंत्री डॉ. पाटील यांच्या हस्ते कर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक के.जी. मावळे, खाडे, अकोला जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, खरिपाची पेरणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना तातडीने बियाणे, खते खरेदीसाठी रक्कम उपलब्ध होणे आवश्यक होते. शासनाने केलेल्या कर्जमाफी निर्णयातील निकष, बँकांनी सुरू न केलेले कृषी कर्ज वाटपामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम आहे. ही बाब लक्षात घेता रविवारी जिल्हा बँक, सहकार खात्याच्या अधिकार्यांची बैठक घेऊन थकबाकीदार शेतकर्यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन केले होते; ते आज प्रत्यक्षात आल्याने कर्ज वाटपाला प्रांरभ झाल्याचे समाधान असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा बँकचे वैद्य यांनी प्रास्ताविकामध्ये दोन जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये असलेल्या सर्वच शाखामधून कर्ज वाटपासाठी नियोजन केल्याची माहिती दिली, तर जिल्हा निबंधक माळवे यांनी कर्ज वाटपासाठी शेतकर्यांना कागदपत्रांच्या जाचक अटी नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी तेजराव चतरकर, महादेव गुलाबराव दुतोंडे, अनिल निकामे, पुरुषोत्तम गोंडचवर, राहुल जवंजाळ या शेतकर्यांना कर्जवाटप करण्यात आले.थकबाकीदार शेतक-यांना मिळणार लाभ३0 जून २0१६ पर्यंंत थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांना तत्काळ दहा हजारांचे अग्रिम कर्ज मिळणार आहे. जिल्हय़ामध्ये ४४ हजार शेतकरी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे खातेधारक आहेत. यासोबतच इतर राष्ट्रीयीकृत बँकांचेसुद्धा खातेदार आहेत. जिल्हय़ात जवळपास ७0 हजार थकबाकीदार शेतकरी या निकषामध्ये पात्र ठरत असल्याने अशा शेतकर्यांना ठरावीक बँकांकडून तातडीने निविष्ठा खरेदीकरिता दहा हजार रुपये कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तोंडावर आलेली खरीप हंगामाची पेरणी लक्षात घेता शेतकर्यांना बी-बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यासाठी ३0 जून २0१६ रोजी थकबाकीदार प्रत्येक शेतकर्याला १0 हजार रुपये देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याचे समाधान आहे. सहकार विभाग व जिल्हा बँकेच्या अधिकार्यांसोबत घेतलेल्या बैठकीतून तातडीने नियोजन करणे शक्य झाल्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळेल.- डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री, अकोला
दहा हजार रुपये कर्ज वाटपास प्रारंभ
By admin | Published: June 20, 2017 4:29 AM