वाशिम: राज्य निवडणुक आयोगाने शेतकरी कर्जमाफीच्या अर्ज यादी पडताळणीतून ग्रामपचांयत निवडणूक होत असलेल्या गावांना वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाºया गावांतील कर्जमाफीचे अर्ज सादर करणारे शेतकरी पात्र, अपात्रेबाबत संभ्रमात सापडले आहेत.
शासनाने नैसर्गि आपत्तीत सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत म्हणून दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय नियमित कर्जाची रक्कम भरणाºया शेतकºयांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचेही ठरविले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले. यानुसार निर्धारित २२ सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत १.२८ लाख शेतकºयांनी आॅनालाइन अर्ज सादर के ले आहेत. आता या अर्जात शासनाच्या निकषानुसार पात्र असणाºया शेतकºयांची निवड करण्यासह अर्जापासून वंचित राहिलेल्या म्हणजेच आॅनलाइन अर्ज करूनही यादीत नाव नसलेल्या शेतकºयांची माहिती घेण्यासाठी चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तथापि, ही प्रक्रिया ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांत राबविली जाऊ नये, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे यंदा निवडणूक होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कर्जदार शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. चावडी वाचन प्रक्रियेनुसार इतर गावांतील शेतकºयांना त्यांच्या पात्र, अपात्रतेची माहिती मिळू शकेल; परंतु ज्या गावांत चावडी वाचनच होत नाही, त्या गावांतील शेतकºयांना हे कळावे तरी कसे असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.