वाशिम - वाशिम जिल्ह्यात सोयाबीन सोंगणीची लगबग सुरू झाली असून, सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी दोन लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकºयांना पावसाची योग्य प्रमाणात साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर अल्पावधीतच पाऊस गायब झाला. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने काही शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने सोयाबीनला प्रचंड प्रमाणात हाणी पोहोचली. मृग नक्षत्रात पेरणी केलेल्या शेतकºयांनी आता सोयाबीन सोंगणी सुरू केली आहे. यावर्षी सोयाबीनच्या एकरी उत्पादनात घट येत आहे. एकरी दोन ते सात क्विंटलदरम्यान उत्पादन होत असल्याने लागवड खर्च व उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसविण्यात शेतकºयांचे ‘बजेट’ कोलमडून जात आहे. हलक्या जमिनीतून एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन येत आहे. त्यामुळे लागवड खर्चही वसूल होत नसल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे. सोयाबीनला किमान सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव मिळणे अपेक्षीत आहे. शासनाने लागवड खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी महादेव सोळंके यांनी केली. दरम्यान, एकाचवेळी मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोंगणीला सुरूवात होत असल्याने ग्रामीण भागात मजूरांची टंचाई जाणवत आहे. मजूरीचे दरही वाढले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकºयांपुढील अडचणीत भर पडत आहे.
सोयाबीनच्या उत्पादनात घट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 1:29 PM
वाशिम - वाशिम जिल्ह्यात सोयाबीन सोंगणीची लगबग सुरू झाली असून, सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी दोन लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकºयांना पावसाची योग्य प्रमाणात साथ मिळाली नाही. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर अल्पावधीतच पाऊस गायब ...
ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर लागवड खर्चही वसूल होईना