वाशिम : प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एड.) प्रथम वर्ष सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय कोट्यातील आॅनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेºयानंतरही अद्याप काही जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी २६ डिसेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावरुन अर्ज करु शकतात. शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्याने डी.एड. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे .सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय कोट्यातील आॅनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेºया घेण्यात आल्या. तथापि, अद्याप काही जागा रिक्तच असल्याने २६ डिसेंबरपर्यंत प्रवेश अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पडताळणी अधिकाºयांनी प्रमाणपत्रांची आॅनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करण्याचा कालावधी २२ ते २७ डिसेंबर २०२० आहे. ज्यांनी यापूर्वी अर्ज पुर्ण भरुन मंजूर करुन घेतला आहे, परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. ज्यांचा अर्ज अपुर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल किंवा लॉगीनमधून प्रिंट घ्यावी. त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्राथमिक शिक्षण पदविका अर्थात डि.एड प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी स्पष्ट केले.
डी.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी २६ डिसेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 5:23 PM