यावेही वैद्यकीय अधिकारी समीर मानधने प्रणिता काकड, तालुका पर्यवेक्षक सुधाकर काळे, पंचायत समिती सदस्य शकीलखां पठाण, सलीम रेघीवाले, माजी सरपंच गणेश भालेराव, सुशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य अलीमखा पठाण, कलीम रेघीवाले, नंदकिशोर गोरे, गोपाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती हाेती. वाशिम जिल्हा परिषदेला नुकत्याच नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिका विविध प्राथमिक आरोग्य केंद्र तथा आरोग्यवर्धनी केंद्राला रुग्णसेवेसाठी वितरित करण्यात आल्या. शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राची रुग्णवाहिका ही जुनी असून, नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते. शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्र हे वाशिम जिल्ह्यातील सर्वांत मोठे आरोग्यवर्धिनी केंद्र आहे. जवळपास ३६ गावांचा समावेश आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत आहे. एक लाखाहून अधिक लोकसंख्या या रुग्णालयाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे येथे नवीन रुग्णवाहिका असणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांनी शिरपूर येथील आरोग्यवर्धनी केंद्राला एक नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी माजी सरपंच रमजान रेघीवाले, मारीफखा पठाण, मुख्तारखा पठाण, बबन भांदुरगे, मुन्ना लांडगे, दिनकर घोडके, सुरेंद्र कदम, मदन गिरहे, भिवा चोपडे, गजानन भालेराव, कैलास भालेराव, गजानन देशमुख, शशिकांत देशमुख, शेख. सुलतान यांचासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:30 AM