कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, जि.प. सदस्य सरस्वती मोहन चौधरी वाशिम, उपस्थिती होती. यावेळी वाशिम जिल्ह्यात प्रथम आगमन प्रसंगी ज्योती ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित महिलांंना मार्गदर्शन करताना ज्योती ठाकरे म्हणाल्या की, बचत गटामुळे व्यवसाय सुरु करण्याची संधी महिलांना मिळाली आहे. त्या संधीचे सोने त्यांनी करायला हवे. प्रत्येक महिलेने स्वत:ला बचत गटाशी जोडले पाहिजे तेव्हाच ग्रामीण भागातील महिला प्रगतीकडे वाटचाल करू शकतील. यावेळी पांडव उमराच्या सरपंच सीमा ढोबळे, तसेच गाव विकास समिती पदाधिकारी,परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन उर्मिला खिल्लारे यांनी, तर आभार प्रदर्शन वाशिम माविमचे लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बचत गटाच्या महिलांनी परिश्रम घेतले.
माविमच्या अध्यक्षांकडून विकास समिती कार्यालयाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:37 AM