- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातीला कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकांनी तपासणीसाठी संकलित केलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या नमुन्यातील अनेक नमुने सदोष आढळले आहेत. याप्रकरणी सद्यस्थितीत ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत आल्या असून, यातील चार कंपन्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने विविध पिकांच्या बियाण्यांचे नमुने संकलित केले आहेत. या नमुन्यांची उगवण क्षमता प्रयोगशाळेत तपासली जात आहे. त्यात जिल्हाभरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातील पथकासह जिल्हा परिषदेच्या पथकाने ९६ पेक्षा अधिक बियाण्यांचे नमुने संकलित केले. त्यापैकी ८५ नमुन्यांचे अहवाल कृषी विभागास प्राप्त झाले असून, त्यातील ३८ नमुने सदोष असल्याने संबंधित कंपन्या कोर्ट खटल्याच्या कक्षेत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. त्यात जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकाºयाच्या मागदर्शनातील पथकाने संकलित केलेले ३४, तर अधीक्षक कृषी अधिकाºयाच्या मार्गदर्शनातील पथकाने संकलित केलेल्या ४ नमुन्यांचा समावेश आहे. शिवाय २० नमुन्यांप्रकरणी संबंधित कंपनीस ताकिद दिली असून, त्यात अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या पथकाचे १२ आणि जि.प.च्या पथकाने संकलित केलेल्या १२ नमुन्यांचा समावेश आहे. सदोष आढलेल्या नमुन्यांत सर्टिफाईड बियाण्यांचे १२, तसेच ट्रुथफुल बियाण्यांच्या ६ नमुन्यांचा समावेश आहे. दरम्यान, अद्यापही ११ नमुन्यांच अहवालाची प्रतिक्षा आहे. या अहवालामुळे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सदोष बियाण्यांचीही विक्री झाल्याचे निष्पन्न होत आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे नमुने सदोष आढळून आल्याने हजारो शेतकºयांनी बियाणे न उगवल्याबाबत केलेल्या तक्रारीत बव्हंशी सत्यता असल्याचे निष्पन्न होत आहे. दरम्यान, सदोष गुणनियंत्रण निरीक्षकांनी संकलित केलेल्या इतरही एका लॉटमधील नमुने सदोष आढळले आहेत; परंतु त्याची विक्री झाली नाही.गुणनियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यात संकलित केलेल्या आणि सदोष आढळून आलेल्या नमुन्यांप्रकरणी संबंधित कंपनीला कायद्यानुसार कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसच्या खुलाशाची प्रतिक्षा आहे. कंपन्यांच्या खुलाशाची पडताळणी करण्यात येणार आहे. ज्या कंपनीचा खुलासा समाधानकारक नसेल, त्या कंपनीवर सदोष बियाणे विक्री प्रकरणी नियमानुसार कोर्ट खटला दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे खुलाशांची प्रतिक्षा आहे.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम
सदोष बियाणे; ३४ कंपन्या खटल्याच्या कक्षेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:24 AM