गावासमोरील ओढ्याच्या काठावरील गावठाणच्या जमिनीवर मागील काही वर्षांपासून व नव्यानेही शेतीसाठी वृक्षतोड करून लोकांनी अतिक्रमण केले आहे. या जमिनीवर एक सार्वजनिक विहीर आहे. ती विहीरदेखील ताब्यात घेऊन त्याचा वापर शेतीसाठी करण्यात येत आहे. गावातील स्त्रिया तेथे कपडे धुण्यासाठी जात होत्या. आता मात्र अतिक्रमणकर्त्याने त्यांना तेथे कपडे धुण्यासाठीही मनाई केली आहे. याबाबत याआधीच तहसीलदारांना तक्रार देण्यात आली असून, ही तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित अतिक्रमणकर्त्यांनी स्त्रियांना शिवीगाळ करणे, धमकी देणे असा प्रकार सुरू केला आहे.
अशा स्थितीत ते अतिक्रमण तत्काळ हटविण्यासाठी गावातील स्त्रियांनी सोमवारी पालकमंञी शंभूराज देसाई, खासदार भावना गवळी व जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना निवेदन दिले आहे.
०००
उपोषणाला बसण्याचा इशारा
अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी करतानाच, अतिक्रमण हटविण्यास दिरंगाई झाल्यास १५ ऑगस्ट २०२१ रोजी उपोषणाला बसण्याचा इशाराही महिलांसह गावकऱ्यांनी दिला आहे. अतिक्रमण केव्हा हटविणार? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.