कारंजा येथे ६ जून रोजी ‘मॅग्मो’ संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. नीना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. हाके हे ५ जून रोजी गंभीर जखमी रुग्णावर उपचार करीत असताना त्याठिकाणी आलेल्या इसमाने आधी माझी तपासणी करा, असे म्हणत सलाईनची बॉटल डॉक्टरांच्या दिशेने फेकली. डॉक्टरांनी त्यास बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने हातातील धारदार शस्त्राने डॉ, हाके यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली असून, अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपीची हिंमत वाढली असून, त्याने ६ जून रोजी पुन्हा रुग्णालयात येऊन डॉ. हाके यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मॅग्मो संघटनेने बैठकीत या घटनेचा निषेध नोंदवला. हल्ला करणाऱ्यास तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. अरविंद भगत, डॉ. प्रसाद शिंदे, डॉ. शंकर नांदे, भाऊसाहेब लहाने, डॉ. सागर जाधव, डॉ. सुप्रिया राजुळे, डॉ. लक्ष्मीकांत राठोड, डॉ. कपिल सुर्वे, डॉ. स्वप्निल हाके, डॉ. शेख, डॉ. पाटील, डॉ. सुभाष बडे, जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश मानके, श्रीरंग कानडे आदींची उपस्थिती होती.
हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:51 AM