बहुजन आघाडीचे रिसोड शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मंगेश राजूरकर हे २० जून रोजी रात्रीच्या दरम्यान चाकोलीवरून येत असताना बालाजी सुतगिरणीजवळील पुलाजवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी चालत्या गाडीवर काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी जाणूनबुजून प्रदीप खंडारे यांच्यावर हल्ला केला असून त्यांना जीवे मारण्याचा कट आखला होता. हल्लेखोरांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य सदस्या किरणताई गिर्हे, जिल्हा सल्लागार डॉ. रवींद्र मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. रंगनाथ धांडे, गिरीधर शेजुळ, तालुकाध्यक्ष सैयद अकिलभाई, विधी सल्लागार ॲड. दशरथ मोरे, अब्दुल मूनफ मो. मूनव्वर, हेमंत मोरे, अर्जुन डोंगरदिवे, विश्वनाथ पारडे, महेश तिडके, नागसेन धांडे, विजय इंगोले, दत्ता शेळके, लक्ष्मण कापुरे, केशवराव सभदिंडे, विजय सिरसाट, गजानन खंडारे, संजय साबळे, शेख तौसिफ, सदानंद गायकवाड, विशाल इंगळे, अक्रम खान, गजानन राऊत, विकी हरकळ, दिलीप चोपडे, राहुल इंगळे,नितीन इंगोले, अनिल सरकटे, कार्तिक भिसे, माया मोरे, कुसुमताई पवार, ज्योतीताई ताकतोडे, शिवाजी मुळे, सचिन नरवाडे, अशोक शिंडोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हल्लेखाेरांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:28 AM