येथील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे टेबल सांभाळणारे कर्मचारी तालुक्यातील असहाय्य, वृद्ध, घटस्फोटीत,अपंग, परित्यक्तांकडून पैसे वसूल करूनही शासकीय लाभापासून वंचित ठेवत असल्याची लेखी तक्रार दस्तापूर येथील विधवा महिलेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे १६ सप्टेंबर रोजी केली
राज्यातील वृद्ध, मुले बाळे नसलेले निराधार, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता यांना समाजामध्ये सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना लागू करण्यात आलेल्या आहेत. दस्तापूर येथील पद्मिनाबाई निंबाळकर यांच्या पतीचे १९ सप्टेंबर १९१९ रोजी मृत्यू झाल्याने कुटुंब अर्थसहाय्य योजना आणि विधवा झाल्याने निराधार मानधन मिळण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२१ ला आभासी पद्धतीने अर्ज केलेला असताना संजय गांधी निराधार योजनेमध्ये कार्यरत असलेले लिपिक यांनी उपरोक्त कामासाठी पाच हजार रुपये दिल्यास मला कुटुंब अर्थसहाय्य मिळेल आणि निराधारांची मानधन सुरू होईल असे सांगितल्याने आशा पोटी मी मागितली तेवढी रक्कम लिपिकास पाच महिन्याआधी देऊनही माझे कुटुंब अर्थसहाय्य आणि निराधार मानधनाविषयी कुठलीच कामे रोख घेऊनही त्यांनी केली नसल्याची लेखी तक्रार श्रीमती निंबाळकर यांनी उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर यांचेकडे केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.