लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सातबारावर वारसाहक्क नोंद करण्यासाठी चार हजार रुपयाची लाच मागितल्याच्या कारणावरून मालेगाव तहसिलच्या तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. बबन चिंतामण राठी (४९) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे.तक्रारदाराचे वडील मयत झाल्याने सातबारावर वारसा हक्क नोंद करण्यासाठी तक्रारदाराने मालेगाव तहसिलचे तलाठी बबन राठी यांच्याशी संपर्क साधला. वारसा हक्क नोंद करण्यासाठी चार हजार रुपयाची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम यांच्याकडे केली. या तक्रारीनुसार ७ आॅगस्ट रोजी मालेगाव तलाठी कार्यालयात पडताळणी करण्यात आली. लाचेची मागणी केल्याचे निदर्शनात आल्याने १० आॅगस्ट रोजी आरोपीविरूद्ध कलम ७, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक एस.व्ही.शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर परळकर व चमूने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक एन.बी.बोºहाडे करीत आहेत. (प्रतिनिधी)
लाचेची मागणी; तलाठ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 7:41 PM