ग्राम नायनी ते जनुना खुर्द हा सुमारे २ किमीचा रस्ता दुरुस्ती, मजबुतीकरण मंजूर आहे. काही अंतराचे काम झाले तर काही अंतर काम होणे बाकी आहे. अर्धवट असलेला हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी नायनी येथील नागरिकांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलदार मानोरा यांच्यामार्फत केली आहे. नायनी येथील हनुमान मंदिरापासून ते गजानन दंदे यांच्या शेतापर्यंत रस्ता अर्धवट आहे. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, नागरिक यांना जनुना येथे व धामनगाव (देव)कडे जाण्यास फेरी मारून जावे लागते. परिणामी, २० किमीचा फेरा पडतो. हा रस्ता पूर्ण करावा याकरिता समाधान शिबिरमध्ये अर्ज केला होता. परंतु हा रस्ता पूर्ण केला नाही. रस्ता काम पूर्ण झाले नाही तर १ मेपासून रस्त्यावर उपोषणाला बसू, असा इशारा गावकरी यांनी दिला आहे. निवेदनावर प्रमोद महल्ले यांच्यासह गावकऱ्यांच्या सह्या आहेत.
रस्ता काम पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:40 AM