दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन काढणी सुरूवात होताच पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसानाची माहिती काही तासात पीक विमा कंपनीला कळविणे बंधनकारक असते. परंतु पीक विमा कंपनीच्या ज्या संपर्क क्रमांकावर शेतकऱ्याला संपर्क करायचा तो भ्रमणध्वनी लागत नाही. फोन लावत असताना प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तासनतास फोन करून सुद्धा फोन लागत नाहीत. त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस येऊन त्रस्त झाले आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा पीक विमा कंपनीसमोर सादर करून सरसकट पीक विमा द्यावा अशी मागणी मोहजा इंगोले ग्रामपंचायतचे सरपंच घनशाम मापारी यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
210921\screenshot_2021-09-21-17-35-17-64.png
सरपंच घनशाम मापारी