मंगरुळपीर कोविड केंद्रावर मूलभूत जागा आणि कक्ष उपलब्ध असल्यामुळे तातडीने प्राणवायू , जीवरक्षक प्रणाली ऑक्सिजन , व्हेंटिलेटर, क्ष किरण तपासणी रक्त तपासणी या सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, ग्रामीण रुग्णालय स्तरावर एम.डी., एम.बी.बी.एस., स्त्रीरोग तज्ज्ञ, बी.ए.एम.एस. युनानी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरावीत, तसेच बी.एच.एम.एस. वैद्यकीय अधिकारी ही पदे भरावीत. मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे भविष्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने शासनाने या ठिकाणी दोन मोठे हॉल उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. ग्रामीण रुग्णालयावर देखरेख व सुविधा निरीक्षणाचे दृष्टीने शहरातील सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, सेवानिवृत्त प्राध्यापक, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांची प्रभावी समिती स्थापन करावी. शहरात तातडीच्या उपाययोजनेच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारण्या त्वरित सुरू कराव्यात, अशी गावंडे यांनी केली आहे.
कोरोनाबाबत उपाययोजना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:43 AM