00
चिखली परिसरात कोरोनाबाबत जागृती
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे चिखली परिसरात १५ ते २० एप्रिलदरम्यान आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
00
अनसिंग परिसरातील हातपंप नादुरुस्त
वाशीम : अनसिंग जिल्हा परिषद गटातील जवळपास आठ हातपंप नादुरुस्त असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हातपंप दुरुस्त केव्हा होणार? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
00
कोरोना प्रतिबंधक पथके कार्यान्वित
वाशीम : कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी नगर परिषदेतर्फे कोरोना प्रतिबंधक पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.
00
३०० व्यावसायिकांची कोरोना चाचणी
वाशीम : कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आरोग्य विभागाने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींसह व्यावसायिकांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. त्यात शहरातील जवळपास ३०० व्यावसायिकांची चाचणी झाली.
00
शहरात शुकशुकाट
वाशीम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मंगळवारी दुपारी १ वाजतानंतर शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
00
अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी
वाशीम : शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम या गौण खनिजाची खदान आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील या जमिनीतून अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. हे थांबविण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
00
खरीप हंगामासाठी माहितीचे संकलन
वाशीम : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कर्ज वितरण, वीज जोडणीच्या संख्येसह इतर माहितीचे संकलन केले जात आहे.
00
रिसोडमध्ये वाढताहेत कोरोनाबाधित
वाशीम : रिसोड तालुक्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यात गोवर्धनसह अन्य खेड्यातही झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनातर्फे तालुक्यातील बहुतांश गावात आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
00
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशीम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर २१ एप्रिलपासून संचारबंदीचे सुधारित आदेश असून, याचे पालन करण्याचे आवाहन वाशीम तालुका प्रशासनाने केले.
00
आरोग्य पथकाची गावात फेरी
वाशीम : वाशीम तालुक्यात कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तपासणी केली जात आहे. यासाठी सोमवारी आरोग्य पथकाने ग्रामीण भागात फेरी मारून माहिती घेतली.
००
एटीडीएम मशीन झाली बंद
वाशीम : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी, नागरिकांना आठ अ, सातबारा ही कागदपत्रे मिळावीत म्हणून एटीडीएम मशीन ठेवण्यात आली होती. त्यामुळे लोकांना आधारही झाला; परंतु कोरोना व तांत्रिक बिघाडामुळे ही मशीन बंद पडली आहे.
00
पशुचिकित्सालय इमारतींची दुरवस्था
वाशीम : पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हाभरातील आठ ठिकाणच्या पशुचिकित्सालय इमारतींची अवस्था वाईट आहे. त्यामुळे पशुपालकांसह कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना पशूंवर उपचार करण्यासह इतर कामकाज करताना अडचणी येत आहेत.