लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : अल्प पाऊस पडल्याने शेतकरी वर्गाचा खरीप हंगाम हातुन गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तेव्हा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी आपचे मंगरुळपीर गण प्रभारी सुरेश सातरोटे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात नमुद आहे की, तालुक्यात खरीप हंगामात योग्यवेळी पाऊस पडला नाही तसेच अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकºयांनी दुबार, तिबार पेरणी करुन सुध्दा उत्पादनात प्रचंड घट झाली तसेच शेतमालाला योग्य भाव नाहीत, शासनाचे मात्र याकडे लक्ष नसुन दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, शेतमजूर त्रस्त झाले आहेत. तेव्हा मंगरुळपीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली.याच बरोबर शहरातील मुख्य चौकात शौचालय व स्वच्छतागृह उभारण्यात यावे अशी मागणी सुध्दा संबंधीतांकडे करण्यात आली असुन निवेदनावर सुरेश सातरोटे, अमिन कलरवाले, वैभव ठाकरे, गणेश वाघमारे, संदीप तिवारी, प्रमोद हणमंते, राम पाटील डोरले, देवानंद सोनोने, उमेश मनवर, पवन अांबेकर, अनिल कांबळे, यांचेसह आदिंच्या स्वाक्षºया आहेत.
मंगरुळपीर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 8:03 PM
मंगरुळपीर : अल्प पाऊस पडल्याने शेतकरी वर्गाचा खरीप हंगाम हातुन गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तेव्हा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी आपचे मंगरुळपीर गण प्रभारी सुरेश सातरोटे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
ठळक मुद्देअल्प पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी