शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी यांच्याकडे परिषदेच्या जिल्हा व तालुका शाखेतर्फे या व अशा विविध मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये संगीतसूर्यांच्या नावाने नाटक आणि संगीत क्षेत्रातील कर्तृत्ववान कलावंतांसाठी पुरस्कार सुरू करावा, संगीत व नाट्य क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी संगीतसूर्याच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करावी, शासकीय पातळीवर संगीतसूर्यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला जावा, या वर्षी त्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त शासनाने स्मृतिशताब्दी विशेषांक प्रकाशित करावा, संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने एक कला, साहित्य व सांस्कृतिक केंद्र स्थापन करावे या मागण्यांचा समावेश आहे. मराठा सेवा संघप्रणीत संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एकाच दिवशी पाठवून देण्याचे ठरवले होते, अशी माहिती या परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा वर्षाताई धाबे यांनी एका पत्रकाद्वारे दिली होती.
या वेळी परिषदेचे वाशिम जिल्हा सचिव गोपाल खाडे, कारंजाचे अध्यक्ष मुरलीधर ताथोड, सचिव ज्ञानेश्वर खंडारे, प्रसिद्धिप्रमुख डॉ. कुंदन श्यामसुंदर, उपाध्यक्ष संजय कडोळे, देविदास नांदेकर, सतीश चव्हाण, गोविंद भोंडणे, प्रणिता दसरे, अशोक ताथोड, ऋत्विक ताथोड, नीता खाडे, विलास कडू, राधिका कडू, जिजाबाई खाडे, विजया ताथोड, हरिश्चंद्र कदम, पुरुषोत्तम बाभुळकर, उमेश अनासाने, अजाबराव भटकर, मीना मानेकर, ब्रह्मदेव बांडे, आदित्य श्यामसुंदर उपस्थित होते, असे परिषदेचे प्रसिद्धिप्रमुख संजय कडोळे यांनी कळविले आहे.