००००
शाळा बंदमुळे ऑटोचालक अडचणीत
वाशिम : कोरोनामुळे गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ऑटोचालक अडचणीत सापडले आहेत. राज्य शासनाने ऑटो चालकांसाठी एखादे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आशिष दांडगे यांनी शनिवारी केली.
००००
अरुंद रस्त्यामुळे वाहतूक प्रभावित
वाशिम : पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे मधला मार्ग म्हणून मंत्री पार्क जवळून वाहने धावत आहेत. हा रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहन आल्यास वाहतूक प्रभावित होते.
००००
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दुकाने
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला लागूनच किरकोळ साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. खाली बसून उघड्यावर साहित्य विक्री करण्याच्या या प्रकारामुळे रुग्णवाहिका ने-आण करताना अडथळा निर्माण होतो.
०००००
‘ बेटी बचाओ ’ अभियान प्रभावित
वाशिम : कोरोनामुळे रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मालेगाव, वाशिम तालुक्यात ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ ’ अभियान प्रभावित झाले आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे यापूर्वी ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ ’ अभियानाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केली होती.
०००
दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : वाशिम, कारंजा, रिसोड यासह प्रमुख शहरांतील बाजारपेठेतील दुकाने शनिवार व रविवारचा अपवाद वगळता सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दरम्यान, काही दुकानांमध्ये गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे शुक्रवारी दिसून आले.
०००
शिरपूर परिसरात उघड्यावर शौचवारी
वाशिम : ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी त्याचा नियमित वापर होत नाही. अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत असल्याचे चित्र शिरपूर परिसरात दिसून येते.