गतवर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतशिवारांमध्ये रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या पूर्णत: पाण्याखाली सापडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खराब झालेले सोयाबीन चक्क फेकून द्यावे लागले. काही शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाले. त्यापैकी काहीजणांनी पुढील काळात चांगला दर मिळेल, या आशेने घरात सोयाबीन साठवून ठेवले. मध्यंतरी वाढलेल्या दरामुळे काही शेतकऱ्यांचा फायदेदेखील झाला; मात्र त्याचे प्रमाण नगण्य असून आगामी खरीप हंगामात होणाऱ्या खर्चासाठी हाती पैसा असावा, या उद्देशाने शेतकरी सोयाबीन विकत आहेत; परंतु व्यापाऱ्यांकडून मालास योग्य दर दिला जात नसल्याची ओरड होत आहे.
तथापि, सोयाबीनला योग्य दर देऊन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यास दिलासा द्यावा, अशी मागणी ॲड. देशमुख यांनी केली आहे.