हिंगाेली रस्ता ते पाेस्ट ऑफिस चाैकापर्यंत सतत वाहनाच्या भल्यामाेठ्या रांगा लागतात, त्यामुळे वाहतूक काेंडी निर्माण हाेऊन वाद हाेताना दिसून येत आहेत. तसेच वाढत्या रहदारीमुळे प्रस्तावित रिंग राेड हाेणे आवश्यक आहे. हा प्रस्तावित रस्ता झाल्यास अनेक अडचणी दूर हाेऊन शहरातील प्रदूषण कमी हाेईल, सततच्या वाहतूक काेंडीपासून नागरिकांना सुटका मिळेल. तरी या प्रश्नाकडे लक्ष देऊन मार्गी लावावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. निवेदनावर प्रशांत भडके, सुभाष उखळकर, रवी गाभणे, संजय भडके, वैभव उलेमाले, आनंद भडके, कुंडलिक मडके, सुमित भालेराव, प्रा. संताेष दिवटे, अमाेल घाेडके, यशवंत हरणे, सुनील परळकर, पवन यादव, सदाशिव काेठेकर , राहुल कुटे, श्रीराम गाडे, गणेश अंभाेरे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
................
खा. गवळींशी सकारात्मक चर्चा
जिल्हयातील प्रस्तावित रिंग राेड संदर्भात नागरिकांनी खासदार भावना गवळी यांची भेट घेऊन रिंग राेड आवश्यकतेबाबत सांगितले. भावना गवळी यांनी सुध्दा सर्व ऐकून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्याचे प्रशांत भडकेंनी सांगितले.