पंकजपाल महाराज हे मानोरा तालुक्यातील रुई गोस्ता या गावचे रहिवासी असून त्यांचे घर मोडकळीस आले आहे. एक वर्षापासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे प्रबोधनकार मंडळी डबघाईस आली आहे. पंकजपाल महाराज हे पूर्ण वेळ प्रबोधनाचेच कार्य करतात. व्यसनमुक्ती, नेत्रदान, देहदान, अंधश्रद्धा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, दारूबंदी, महिला सक्षमीकरण, राष्ट्रीय एकात्मता अशा शेकडो विषयांवरील त्यांचे प्रबोधन अतिशय रंजक असतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्य शासनाने त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अनेक सामाजिक क्षेत्रातील संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कार बहाल केले आहेत. पंकजपाल महाराज हे मानोरा तालुक्यातील आहेत. कोरोना महामारीच्या काळात उद्भवलेल्या बेकारीमुळे ते अडचणीत आले आहेत. या अडचणीच्या क्षणी त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, असे समजून मनोहर राठोड यांच्या परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांना निवेदन पाठवून प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांना घरकूल योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे.
प्रबोधनकार पंकजपाल महाराजांना घरकूल देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:41 AM