लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांनी १४ नोव्हेंबर रोजी मध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक कार्यालयावर धडक दिली. यावेळी वेतन पथकाच्या अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजने अंतर्गत जमा निधीचे वार्षिक विवरणपत्र (फॉर्म आर -३) देण्याबाबत अमरावती विभागातील माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन पथकाच्या अधीक्षकांना आदेश देण्याबाबत तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व न्यायालयातून अंतरिम आदेश मिळालेल्या कर्मचाºयांना जीपीएफ खाते सुरू करुन पावत्या देण्याबाबत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले होते. सदर निवेदनाच्या संदर्भान शिक्षण उपसंचालकांनी लवकरात लवकर डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या देण्याचे लेखी आश्वासन देऊन तशी कार्यवाही करण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन पथकाच्या अधीक्षकांना कळविले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांनी वेतन पथक अधीक्षकांचे कार्यालय गाठून डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या देण्याची मागणी लावून धरली. यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप देशमुख, जिल्हा सचिव राजेश गोटे यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी शिक्षक धडकले वेतन पथक कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:50 PM