वाशिम - वाशिम जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये २२ ते २५ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
रविवारी वाशिम जिल्हयात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपिट झाली. सोमवारी सायंकाळी कारंजा तालुक्यात गारपिट व अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील काही भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने नुकसानग्रस्तांना भरघोष मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाºयांनी केली.
पिकाच्या नुकसान भरपाई व जिवित हानीबद्दल पिडीतांना शासनाने प्रत्येकी दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी छावा संघटनेने केली. गारपीटीमुळे कापूस, आंबा, हरभरा, भाजीपाला, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले उत्पन्न पाहता पाहता निघून गेले. नैसर्गीक आपत्तीमध्ये सापडलेले शेतकरी व जिवित हाणीग्रस्त कुटुंबांना तातडीने अर्थसहाय्यची कार्यवाही होण्यास प्रशासकीय कार्यवाहीमध्ये वेळ होत असल्यास तात्काळ सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात यावे. सानुग्रह अनुदानाची रक्कम रुपये १० लाखापेक्षा कमी नसावी अशी मागणी संघटनेने केली. यावेळी छावा संघटनेचे विदर्भ संपर्कप्रमुख मनिष डांगे, विदर्भ संघटक गणेश गांजरे, जिल्हा संपर्कप्रमुख गजानन काळपांडे, जिल्हा निरिक्षक दिपक पानझाडे, जिल्हा प्रवक्ता संजय ढवळे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी पडघान यांच्यासह अ.भा. छावा संघटना, सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजिक संघटना, छावा गणेशोत्सव मंडळ, छावा नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पार्डी तिखे परिसरातील हरभरा व गहू, संत्रा आदींचे अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. सरपंच शेषराव दगडूजी अंभोरे, पोलीस पाटील श्रीकांत तिखे यांनी शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत देण्याची मागणी सरपंच शेषराव अंभोरे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे जिल्हाधिकाºयांमार्फत १२ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली. शारदा खोडके, नारायण अमृता तिखे, गणेश फलटणकर, रामेश्वर पुंजाजी वडकर, गणेश वडकर, प्रकाश धूड, विश्वनाथ लोडजी पोफळे, गीताबाई वडकर, प्रभाकर तिखे यांच्यासह ३० ते ४० शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असून, शासनाने भरघोष मदत द्यावी, अशी मागणी सरपंच, पोलीस पाटलांसह शेतकºयांनी केली.
वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी बुधवारी केली.