यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष विनोद नरवाडे, समिती उपाध्यक्ष विजय भड, कारंजा तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम म्हातारमारे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष साहेबराव जाधव, गिरीशराव देशमुख, एस. के. सूर्यवंशी, एस. कोरडे, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी आर. एन. कायंदे, शिक्षक पी. एस. खडसे, अरविंद ठाकरे, के .आर. भुतेकर, डी. डी. शिंदे, डी. बी. दुतोंडे, एम. डी. गरड, एस. एम. खडसे, व्ही. बी. खंडारे, टी. पी. गरड, सारंग शिंदे, प्रशांत डोंगरदिवे, प्रकाश मुंडे, राठोड, चाकूरकर यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित, अंशत अनुदानित, टप्पा अनुदानावर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी जुनी पेन्शन योजना काेअर समिती यांच्याकडून लढा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनाही तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:26 AM