लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, डॉलरचे घसरणारे मुल्य, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार हे सुरक्षित व खात्रीलायक गुंतवणूक म्हणून सोने, चांदी खरेदीकडे वळले. परिणामी सोने, चांदीच्या दरात विक्रमी वाढ होत असून, गेल्या सात दिवसात सोन्याचे प्रती तोळा दर हे तीन हजाराने तर चांदीचे प्रती किलो दर १२ हजार रुपयाने वाढले आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे आणि आताही बसत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था प्रभावित होत असून, शेअर बाजारात अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीचा चांगला आणि खात्रीलायक पर्याय म्हणून गुंतवणुकदार हे सोने, चांदीमध्ये गुंंतवणूक करीत असल्याचे दिसून येते. सध्या चांदीच्या दरात झालेली वाढ ही गेल्या ५० वर्षातील सर्वाधिक वाढ असल्याचे व्यापाºयांकडून सांगितले जाते. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने, चांदीचे दागिने खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असल्याने साहजिकच मागणी वाढल्याने सोने, चांदीच्या दरातही तेजी आली आहे. आगामी काही दिवसात सोने, चांदीचे दर आणखी तेजीत येण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली. वाशिम येथे गेल्या आठ दिवसात सोन्याचे दर तीन हजाराने तर चांदीचे दर (प्रती किलो) १२ हजार रुपयाने वाढले आहेत.
मागणी वाढली; सोने, चांदीला झळाळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 4:55 PM