दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, रिसोड येथील पंचायत समितीमध्ये वरिष्ठ सहायक या पदावर सद्या कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला आहे. ज्यावेळी तक्रार करण्यात आली व सदर प्रकरण हे अंगलट येण्याची शक्यता दिसताच त्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेली रक्कम ९११९० रुपये बँकेत भरणा केला; परंतु शासकीय कर्जमाफी योजनेचा लाभ घेताना त्यांनी शासकीय कर्मचारी असल्याचे शासनापासून लपवून ठेवून शासनाची फसवणूक केली आहे. म्हणून त्या कर्मचाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रारदाराने यापूर्वी सुद्धा २५ जानेवारी रोजी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. परंतु कार्यालयाने त्या अर्जाची दखल घेऊन आरोपी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पुन्हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दोषीवर कारवाई करावी. दोषीवर कारवाई न झाल्यास १ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.