निसर्ग पर्यटन केंद्रातील अमूल्य वनसंपदा सुरक्षित राहावी, यासाठी चोहोबाजूंनी करण्यात आलेले लोखंडी तार कुंपन (फेन्सिंग) मानकाप्रमाणे ४५ बाय ४५ खोल आणि रुंद खड्डा खोदून त्यामध्ये सिमेंट पोल उभारणे गरजेचे होते; मात्र काकड चिखली येथील बीट क्रमांक ४३७ मधील तार कुंपणाचे सिमेंट पोल मानकाप्रमाणे न ऊभारता थातूरमातूर काम करण्यात आले. हे तार कुंपण कधीही जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. तार कुंपणासाठी वापरण्यात आलेली लोखंडी जाळी जागोजागी फाटलेली आहे. यामुळे वनसंपदा व इतरही माैल्यवान साधने चोरीला जाण्याची शक्यता आहे, असे राठोड यांनी निवेदनात नमूद केले.
श्री संत सेवालाल महाराज निसर्ग पर्यटन केंद्रातून मागील काही महिन्यांत सौर ऊर्जेच्या दिव्यांसाठी आवश्यक असलेल्या तब्बल १६ बॅटऱ्या चोरीला गेल्या. त्याचा तपास अद्यापपर्यंत लागलेला नाही. याकडे लक्ष देण्यासह निसर्ग पर्यटन केंद्रातील कामांची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी शुभम राठोड यांनी केली आहे.