वाशिम जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेले गाव आहे. येथील लोकसंख्या जवळपास २५ हजारांहून अधिक आहे. शिरपूरला २५ ते ३० खेडी जोडलेली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठा उपबाजारही शिरपूर येथे आहे. यासह शाळा, महाविद्यालयाची संख्या मोठी आहे. त्यामुळे साहजिकच येथे नियमित वर्दळ असते. सततचा वर्दळीमुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अप्रिय घटना टाळण्यासाठी शिरपूरच्या विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करणे गरजेचे आहे. मात्र यासाठी किमान २५ लाख रुपये खर्च आहे. सीसीटीव्ही कॅमेरासाठी लागणारा २५ लाख रुपयांचा निधी आमदार अमित झनक यांनी आमदार विकास निधीतून द्यावा, अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने ६ मार्च रोजी करण्यात आली. या निवेदनावर अध्यक्ष संतोष भालेराव यांच्यासह व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. व्यापारी संघटनेच्या निवेदनाची दखल घेऊन आमदार झनक यांनी सुद्धा सीसीटीव्हीसाठी लागणारा निधी तत्काळ प्रस्तावित करण्यात येईल असे सांगितले.
शिरपुरात आमदार निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:39 AM