कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोलामार्गे काही रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे सुरू झालेल्या रेल्वे बंद करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबीचा विचार करून या मार्गावरील लांब लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या पूर्ववत सुरू कराव्यात तसेच सदरचा रेल्वे मार्ग उत्तर दक्षिण जोडण्यासाठी अत्यंत कमी किलोमीटरचा असल्यामुळे या रेल्वे मार्गावरून इतर अनेक नवीन गाड्या सुरू करण्यात याव्यात जेणेकरून रेल्वे प्रवाशांच्या पैशाची तसेच वेळेची खूप मोठी बचत होणार आहे. असे गुलाटी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. नांदेड-हिंगोली-
वाशिम-अकोला या मार्गाने धावणाऱ्या रेल्वेगाडी १२४८५ / ८६ व १२४३९ / ४० या क्रमांकाची नांदेड-नवी दिल्ली-श्रीगंगानगर, गाडी क्रमांक २२४५७/५८ नांदेड-दिल्ली-उनाहिमाचल प्रदेश, गाडी क्रमांक १२४२१/२२ नांदेड-दिल्ली-अमृतसर या रेल्वे गाड्या प्रारंभ करण्याची मागणी* जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड-दिल्ली- श्रीगंगानगर ही गाडी सुरू करण्यात आली होती. मराठवाडा व विदर्भाच्या बसमत, हिंगोली, अकोला, वाशिम आदी क्षेत्रातील हजारो यात्रेकरूंना उत्तर भारतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदर रेल्वेगाड्या त्वरित प्रारंभ करण्यात याव्या, अशी मागणी* दक्षिण मध्य रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य महेंद्रसिंग गुलाटी यांनी केली आहे. या निवेदनावर डीआरयूसीसी जुगलकिशोर कोठारी, डॉ. दीपक ढोके, नीलेश सोमाणी, तेजराव वानखडे, शिखरचंद बागरेचा यांच्यासह अमजद बेग वसमत, राकेश भट्ट हिंगोली, शोएब वसेसा, सैयद रियाज अलि, अकोला येथील सुभाषसिंग ठाकूर, आदींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.