सध्या कोरोना लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत झाले आहेत. मात्र लसीकरणासाठी आवश्यक असलेले लसीचे डोस मिळत आहे. असाच काहीसा प्रकार २९ एप्रिलपासून शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रात दिसून येत आहे. २९ एप्रिल ते १० मेपर्यंत आरोग्यवर्धिनी केंद्रातील लसीकरण केंद्रात लस उपलब्ध नव्हती. ११ मे रोजी केवळ शंभर लसीचे डोस उपलब्ध झाले. त्यामुळे सकाळीच मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी मोठी गर्दी निर्माण झाली. केवळ शंभरच लसीचे डोस असल्याने आरोग्यवर्धिनी केंद्रातील अधिकाऱ्यांनी ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील दुसरा डोस देण्याचे नियोजन केले. त्यातही लसीकरणाची साठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. लसीकरण केंद्रामध्ये पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांनी स्वतः भेट देऊन नागरिकांना लाइनमध्ये उभे करून शिस्तबद्ध पद्धतीने लस घेण्याचे आवाहन केले. शिरपूरसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या गावात व अधिक प्रमाणात लसीचा डोस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
लस उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:42 AM