-----------
इंझोरी येथील पथदिवे दुरूस्तीची मागणी
इंझोरी : पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या दिवसांत रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरूस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
^^^^^^^^^^^^^^^
महावितरणची मान्सूनपूर्व कामे प्रलंबित
वाशिम : दरवर्षीप्रमाणे यंदाही महावितरणकडून मान्सूनपूर्व दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. वाशिम तालुक्यात मात्र वीज तारांवर चढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासह इतरही विविध कामे अद्याप प्रलंबितच आहेत.
--------
वन्यप्राण्यांमुळे पीक संकटात
वाशिम : बांबर्डा परिसरातील ९८ टक्क्यांवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली असून, या पिकांचे अंकुरही वर आले आहेत. आधीच पावसाअभावी हे पीक संकटात सापडले असतानाच. आता वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने हे पीक संकटात सापडले आहे.
^^^^
रस्त्याची अवस्था वाईट
वाशिम : वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहांगीर फाटा नजिक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे. यातून एखाद्या वेळी मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची भीती आहे.