रिसाेड : मागील अनेक महिन्यांपासून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोणी रोडवरील मुख्य प्रवेशद्वार बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत त्रासाचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी हा हंगाम अत्यंत महत्त्वाचा आहे. इतक्या दिवसांपर्यंत काेराेना संसर्गामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती, परंतु सध्या काही प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांना सिव्हिल लाइनच्या रस्त्याने कृषिमाल विकण्याकरिता वेळ लागत आहे. सिव्हिल लाइन रस्ता अत्यंत खराब व वर्दळीचा असल्यामुळे ट्रॅक्टर व इतर गाडीवाले त्या रस्त्याने शेतमाल नेण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे त्यांना भाड्याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे मोजावे लागतात. यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून लोणी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार तत्काळ सुरू करण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे पाटील, गोरख बोरकर, दीपक मामा मापारी आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.
बाजार समितीचे बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:51 AM