मागील दीड वर्षापासून देशात कोरोना विषाणूने थैमान घातले. लाखो लोकांना या विषाणूची लागण झाली. कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसाय बंद पडले. कामगार, मध्यमवर्गीय, भूमिहीन बेजार झाले. हाताला रोजगार नसल्यामुळे वीज बिल थकले. थकीत वीज बिल वसुलीसाठी वरिष्ठ पातळीवरून सक्तीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी थकीत ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरण्यासाठी तगादा लावत आहे. वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. थकीत ग्राहक हे मजूर, भूमिहीन व लघु उद्योजक असल्यामुळे त्यांना एकरकमी वीज बिल भरणे शक्य नाही. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना वीज बिल भरणे शक्य झाले नाही. ज्यांचे वीज बिल थकीत आहे, अनेक ग्राहकांचे ५ ते १० हजारांपर्यंतचे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे त्यांना एकरकमी वीज बिल भरणे शक्य नाही. अशा ग्राहकांना तीन ते चार टप्पे पाडून वीज बिल भरण्याची मुभा देण्याची मागणी गोपालआप्पा महाजन यांनी
केली.