निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे विविध पदांची लेखी चाचणी घेण्यात आली. या भरतीमध्ये काही भोंगळ कारभार होऊन संबंधित अधिकाऱ्यांचे आणि अनियोजित कार्यभारमुळे परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला व नागपूर येथील जी.एच. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे परीक्षा होण्याअगोदरच पेपरची सील तुटलेली होती. परीक्षार्थींची बसण्याची व्यवस्था न करता एका बेंचवर एकापेक्षा जास्त परीक्षार्थींना बसविण्यात आले होते, तसेच परीक्षार्थींना कोरोनाच्या गाइडलाइननुसार कोणतीही उपायोजना नव्हती. यावर काही परीक्षार्थींनी आक्षेप घेतला असता त्यांना मारहाणीची घटनासुद्धा या परीक्षा केंद्रावर घडली, तसेच अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद व महाराष्ट्राच्या बऱ्यांच जिल्ह्यात सर्रास गैरवापर करण्यात आला व मोबाइलद्वारे प्रश्नांची उत्तरे सोडविण्यात आली. यासाठी काही ठिकाणी विविध रॅकेटही कार्यरत होते. तरी एकीकडे कोरोनाचा प्रकोप, तर दुसरीकडे वाढती बेरोजगारी, तसेच शासकीय नोकऱ्यांची जाहिरात बऱ्याच वर्षांनी निघाल्याने बेरोजगार तरुण- तरुणींनी दिवस- रात्र अभ्यास करून मेहनत घेऊन परीक्षा दिली; पण सर्रास नक्कल व परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे त्यांच्यावर अन्याय होण्याची पाळी आलेली आहे. काही परीक्षा केंद्रांवर तर परीक्षेच्या पेपरचे सील परीक्षेपूर्वीच तुटलेले होते, याची योग्य चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर शेख वकार, मीर खान, मो. नदीम, आवेज अली व स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (एस.आय.ओ.)च्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहोत.
आराेग्य विभागाची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:19 AM