..................
हिवताप कार्यालयाची इमारत जीर्ण
वाशिम : शहरातील रिसोड रस्त्यावर असलेली जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची इमारत गेल्या अनेक महिन्यांपासून जीर्ण झाली आहे. याशिवाय त्याठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधादेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. या समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी संबंधितांमधून होत आहे.
..............
जऊळका परिसरात अवैध रेती वाहतूक
वाशिम : जिल्ह्याबाहेरून येत असलेल्या वाहनांद्वारे जऊळका परिसरात अवैध रेती वाहतूक केली जात आहे. हा प्रकार पोलीस व महसूल विभागाला माहीत असूनदेखील वाहनांवर कारवाई केली जात नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
...........
किन्हीराजा अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पाऊस झाल्यास रस्त्यावर चिखल साचून नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहनचालकही यामुळे त्रस्त झाले आहेत. संबंधित यंत्रणेने लक्ष पुरविण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
........
ग्रामीण भागात धूरमुक्त अभियानाला खीळ
वाशिम : एलपीजी गॅस-सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढच होत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले असून, उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेल्या बहुतांश महिलांनी दरवाढीमुळे गॅसचा वापर बंद केल्याने धूरमुक्त अभियानाला खीळ बसली आहे.
..................
अनसिंग येथे कोरोनाविषयक जनजागृती
वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथे मंगळवारी ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोरोनाविषयक जनजागृती करण्यात आली. तोंडाला मास्क वापरण्यासह हात नियमित स्वच्छ ठेवा, लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घ्या, असे आवाहन यादरम्यान करण्यात आले.
............
दुचाकीवर तिबल सीट वाहतूक
वाशिम : वेळोवेळी दंडात्मक कारवाई करूनही शहरात अनेक ठिकाणांहून दुचाकी वाहनांवर तिबल सीट वाहतूक सुरूच असल्याचा प्रकार घडत आहे. शहर वाहतूक विभागाने याप्रकरणी बुधवारी पुन्हा अनेकांवर कारवाई केली.
.........
लसीकरण करून घेण्याचे आवाहन
वाशिम : ग्रामीण भागात काही ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक अद्याप लसीकरणासाठी पुढे यायला टाळाटाळ करीत आहेत. कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्याकरिता प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.
..............
अमानी फाट्यावर पोलिसांकडून कारवाई
वाशिम : मालेगाव तालुक्यातील अमानी फाटा येथे वाशिमवरून मालेगावकडे जाणाऱ्या वाहनांवर पोलिसांच्या पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास कारवाई केली. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.
...............
उपाययोजनांची चोख अंमलबजावणी
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अंमलात आलेल्या विविध उपाययोजनांची शहरात चोख अंमलबजावणी केली जात आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभागाने बुधवारी कारवाई केली.
..............
गावठाण सर्वेक्षण सुरू करण्याची मागणी
वाशिम : कोरोनाचे संकट आता बहुतांशी निवळलेले आहे. त्यामुळे गावठाण सर्वेक्षणाचे काम विनाविलंब सुरू करावे. त्यासाठी तालुकास्तरीय समिती सदस्यांनी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
............
दुकाने सुरू झाल्याने लघुव्यवसायास उभारी
वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर दुकानांसह पादचारी मार्गावर बसून व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांची दुकानेही बंद ठेवावी लागली; मात्र काही दिवसांपासून दुकाने पुन्हा सुरू झाली असून लघु व्यवसायाला उभारी मिळाल्याचे दिसून येत आहे.