जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटासोबतच नैसर्गिक संकटात सापडल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीनची विक्री केली. अनेकांकडील सोयाबीन संपल्यानंतर त्याचे दर ७ हजार रुपये प्रतिक्विंटल झाले. राज्य सरकारने पीक आणेवारी कमी प्रमाणात जाहीर करून पीक कर्ज, वीज बिलाबाबत दिलासा दिला. मात्र, तोही निष्फळ ठरला. त्यामुळे किमान रासायनिक खताच्या दर फरकाची रक्कम तरी परत करावी, अशी मागणी मुठाळ यांनी केली आहे.
................
ग्रामस्थांनी घेतला लसीचा दुसरा डोस
वाशिम : येथून जवळच असलेल्या अडोळी या गावात कोरोना लसीचा ज्यांनी पहिला डोस घेतला, त्यांनी २७ मे रोजी लसीचा दुसरा डोस घेतला.
गावातील ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या स्त्री-पुरुषांनी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अडोळी येथील उपसरपंच भगवान इढोळे, ग्रा.पं. सदस्य गजानन इढोळे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पडघान, सुरेश इढोळे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गो.रा. मुंदडा, प्रमोद इढोळे, उपकेंद्राच्या समुपदेशन अधिकारी डॉ. नीता मापारी, आरोग्यसेवक मारोती इंगळे, काळबांडे, सुनीता कुटे यांची उपस्थिती होती. अंगणवाडी सेविका छाया खंडारे, आशा वर्कर वनमाला पडघान, सीमा पडघान यांचे सहकार्य लाभले.