शिरपूर येथील बसस्थानक परिसराच्या मागील भागात देशी दारू दुकानाजवळ सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाणारा मोठा सिमेंट नाला आहे. या नाल्यावर मागील चार-पाच वर्षांत काही ठिकाणी पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे पाऊस पडल्यानंतर पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. याचा लगतचा रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. झालेल्या अतिक्रमणामुळे पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली. मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या पावसाने नाली ओव्हर फ्लो होऊन लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसण्याचा प्रकार घडला. यामुळे नाली काठालगतचा रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या नाल्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी २४ जून रोजी एका निवेदनाद्वारे किशोर देशमुख यांनी ग्रामपंचायतकडे केली आहे. निवेदनावर संजय प्रभाकर जाधव, माधव देशमुख, अमोल देशमुख, किशोर जाधव, विजय चव्हाण, आतिष जाधव यांच्यासह परिसरातील ३५ रहिवाशांच्या स्वाक्षरी आहेत.
मुख्य नाल्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:29 AM