............................
रिक्त पदांमुळे कामकाज प्रभावित
वाशिम : अन्न व औषध प्रशासन विभागात महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. यासंबंधी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर टेरकर यांनी शुक्रवारी दिली.
.......................
फलकाअभावी घडताहेत अपघात
मेडशी : मेडशी ते अकोला या रस्त्यावर असलेल्या वळणमार्गावर कुठलाही फलक नसल्याने दैनंदिन किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्याच्या दोन्हीकडून फलक लावण्यात यावा, अशी मागणी शे. रऊफ यांनी गुरुवारी केली.
.................
आययूडीपीत रात्रगस्त वाढविण्याची मागणी
वाशिम : शहरातील आययूडीपी कॉलनीत रात्रीच्या सुमारास घरे सुरक्षित राहावी, यासाठी रात्रगस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी विशाल शिंदे यांनी पोलीस प्रशासनाकडे गुरुवारी निवेदनाव्दारे केली.
................
ऑडिट करून घेण्याच्या सूचना
किन्हीराजा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांकडून प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर व इलेक़्ट्रिक ऑडिट करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी बुधवारी दिली.
.......................
‘सखी वन स्टॉप’कडे सर्वाधिक तक्रारी हिंसाचाराच्या
वाशिम : सखी वन स्टॉप सेंटरकडे प्राप्त होणा-या एकूण तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. यासह पतीच्या मृत्यूनंतर निराधार होणा-या महिलांकडूनही तक्रारी केल्या जातात, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.
.................
जिल्हा रुग्णालयात पाणी उपलब्ध करण्याची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणा-या रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. ते उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेचे मनीष डांगे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.
.................
नियमाचे पालन करण्याचे आवाहन
जऊळका रेल्वे : कोरोनापासून बचावासाठी शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांची अनेकांकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी येथे मंगळवारी केले.
...............
ध्वजारोहणाला मर्यादित स्वरूपात उपस्थिती
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती मर्यादित स्वरूपात राहणार आहे. त्यानुषंगाने सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २२ जानेवारी रोजी केले.
....................
घाटेअळीमुळे हरभरा पिकाचे नुकसान
मालेगाव : वातावरणातील बदलामुळे अनेक ठिकाणी हरभरा पिकावर घाटेअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे पिकाचे नुकसान होत असून सरासरी उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकरी चंद्रकांत कुटे यांनी वर्तविली आहे.
...................
अवैध रेती वाहतूकीवर प्रशासनाची नजर
वाशिम : तालुक्यात एकाही रेतीघाटावरून रेतीची उचल होत नाही; परंतु बाहेरगावहून अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती असून त्यावर प्रशासनाची करडी नजर असल्याची माहिती तहसीलदार विजय साळवे यांनी सांगितले.
................
राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग
वाशिम : जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेकडून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या खेळाडूंनी मुंबई येथे २० जानेवारीला पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदविला.
...................
बसथांब्याची जागा बदलण्याची मागणी
वाशिम : शहरातील रिसोड नाक्यापासून जवळच मुख्य रस्त्यावर बसचा थांबा देण्यात आला आहे. त्या ठिकाणी वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे बसथांब्याची जागा बदलण्यात यावी, अशी मागणी सागर आळणे यांनी केली.