अंगणवाडी केंद्रात ६ वर्षांआतील बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांना स्वत:ची इमारत नाही तर काही अंगणवाडी केंद्राच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृह, शौचालयाची व्यवस्थाही नाही.
०००००
विकासात्मक कामे अपूर्ण
केनवड : केनवड जिल्हा परिषद गटातील काही गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतची विकासात्मक कामे अपूर्ण आहेत तर काही ठिकाणी या कामांची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागातील दलित वस्तींचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येते.
0000
स्वच्छतेचा बोजवारा
अनसिंग : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१९ मध्ये जनजागृती करीत उघड्यावरील शौचास जाणाऱ्यांवर कारवाई केली होती. कोरोनामुळे २०२० मध्ये कारवाईची मोहीम नसल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे परिसरात दिसून येते.
गाव हागणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत लाभार्थिंना १२ हजारांचे अनुदान देण्यात आले. परिसरात अनेक लाभार्थिंनी याचा लाभ घेतला. परंतु, नियमित वापर नसल्याने काही शौचालये ही अडगळीत पडल्याचे दिसून येते.