---
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
पांगरी नवघरे : मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे ते अमानी दरम्यानच्या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असमन, तो मोडकळीस आलेला आहे. त्यामुळे अपघाताची भीती असल्याने या पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
---------
आसेगाव बांधाच्या पातळीत वाढ
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यात आसेगाव परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने निम्मा पावसाळा उलटूनही आसेगाव प्रकल्पात १० टक्केही साठा झाला नव्हता. आता शुक्रवारी आलेल्या पावसामुळे या प्रकल्पाच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे.
--------------
इंझोरीत ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम: मानोरा तालुक्यातील इंझोरी ग्रामपंचायत कोरोना नियंत्रणासाठी विशेष दखल घेत असून, गेल्या चार दिवसांपासून कोरोना नियंत्रणासह पावसाळ्याच्या दिवसांत होणा-या संभाव्य आजारांबाबत गावात जनजागृती करण्यात येत आहे.
------------
पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात
वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव येथे गावातील मुख्यमार्गाचे काम करण्यात आले; परंतु हे काम करताना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन न केल्याने आता पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरून त्यांना त्रास होत आहे.
-------------