.............
रात्रीच्या वेळी रेतीची अवैध वाहतूक
केनवड : रिसाेड तालुक्यात एकाही रेतीघाटावरून रेतीची उचल होत नाही; परंतु बाहेरगावहून अवैध रेती वाहतूक सुरू असून याकडे संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. शक्यताेवर रात्रीच्यावेळी रेतीचे ट्रक भरुन जात असल्याचे दिसून येत आहे.
..............
पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
किन्हीराजा: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत (पोकरा) अंतर्गत शेती शाळेच्या आधारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. किन्हीराजा परिसरात पोकरा प्रकल्पातील विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देतानाच रब्बी आणि फळपिकांवरील कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
..............
शिरपूर- वाशिम रस्त्याची डागडुजी
मालेगाव : शिरपूर-वाशिम मार्गाच्या दर्जोन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून ९.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी, त्या कामाला थोडा कालावधी लागणार असल्याने मार्गाची सध्याची स्थिती पाहता. या मार्गाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली.
..............
शिरपूर- वाशिम रस्त्याची डागडुजी
जऊळका रेल्वे : : जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, या जुन्या नोटा बंद होण्याबाबत वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना नसतांना अनेकजण या नाेटा स्वीकारत नसल्याचे दिसून येत आहे.
.............
नियमाचे पालन करण्याचे आवाहन
रिठद : कोरोनापासून बचावासाठी शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांची अनेकांकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन नियमाचे पालन करावे, असे आवाहन वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी येथे मंगळवारी एका कार्यक्रमात केले.
............
दीड एकर हरभरा वन्य प्राण्यांकडून उद्ध्वस्त
मेडशी: परिसरात हरिण, माकड आदी वन्य प्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यात गत तीन दिवसात माकडे आणि हरणांच्या कळपांनी हरभरा पिकात हैदोस घालून एका शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर पीक फस्त केले.