^^^^^^^^^
इंझोरी येथील पथदिवे दुरुस्तीची मागणी
इंझोरी: पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या दिवसांत रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
---------------
पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
वाशिम: जिलह्यात जूनच्या सुरुवातीपासूनच सतत पाऊस पडत असून, या महिन्यात १८ दिवस पावसाचे राहिले; परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली. गेल्या २२ दिवसात अनेक गावात नावालाच पाऊस पडला. त्यामुळे अद्यापही काहींच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी
वाशिम : गतवर्षी १० व १२ जुलै रोजीच्या पावसामुळे रिठद परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी ८ जुलै रोजी महसूल व कृषी विभागाकडे केली.
----
थकीत कर्जदारांना पीककर्ज मिळेना
इंझोरी: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र असूनही, आतापर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना ८ जुलैपर्यंत नव्याने पीककर्ज मिळाले नाही. पीककर्ज देण्यात यावे, अशी मागणी वंचित शेतकऱ्यांनी ९ जुलै रोजी केली.
--------------
तणनाशक फवारणीत शेतकरी व्यस्त
वाशिम: सध्या खरीप पिकाची पेरणी उरकली असून, पिकात वाढणाऱ्या तणाचा बंदोबस्त करण्यासाठी विविध प्रकारच्या तणनाशकांची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे १० ते ११ जुलै दरम्यान दिसून आले.
------
धरणावर वाढली झुडपे
वाशिम: मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथील धरणाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून मूळ खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे.