--------------
पीक कर्ज वाटप संंथ
वाशिम : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असतानाही धनज बु. परिसरातील बँकांत पीक कर्ज वाटपाचा वेग संथ आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असून तातडीने पीक कर्ज वाटप करणे आवश्यक ठरत आहे.
------------------
आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत वाशिम तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी गर्भवती व स्तनदा मातांसह ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
-------
विद्युत पथदिवे दुरूस्तीची मागणी
वाशिम: पावसाळा सुरू झाला असून रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील खेडेगावातील काही ठिकाणचे नादुरूस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
------------
ग्रामपंचायतीच्या इमारती झाल्या शिकस्त
वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. याच शिकस्त इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार चालवावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात यामुळे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
---