शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

घर बांधकाम परवानगीसाठी ४५ हजार रुपयांची मागणी;  नगर रचना सहायक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 5:34 PM

Bribery News नितेश ओमप्रकाश चौरसिया याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ फेब्रुवारी रोजी मंगरूळपीर येथून ताब्यात घेतले.

वाशिम : ४५ हजार रुपये द्या आणि दुकान व घराचा बांधकाम परवाना घेऊन जा, असे म्हणत लाचेची मागणी करणाºया मंगरूळपीर नगर परिषदेतील रचना सहाय्यक (वर्ग दोन) नितेश ओमप्रकाश चौरसिया याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ फेब्रुवारी रोजी मंगरूळपीर येथून ताब्यात घेतले.मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने जवळपास तीन ते चार महिने घर, दुकानांची बांधकामे प्रभावित झाली होती. त्यानंतर बांधकामांना परवानगी मिळाल्याने अनेकजण विविध प्रकारच्या बांधकामांकडे वळले असल्याचे दिसून येते. दुकान किंवा घर बांधकाम करण्यासाठी नगर परिषदेची परवानगी बंधनकारक आहे. मंगरूळपीर येथील एका ५३ वर्षीय तक्रारदार इसमाने दुकान व घर बांधकामासाठी परवानगी मिळावी यासाठी रितसर अर्ज सादर केला. रचना सहाय्यक नितेश चौरसिया याने दुकान व घर बांधकाम परवानगी देण्याकरीता तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर २५ जानेवारी व २७ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपीने ३५ हजार रुपये लाच स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे आढळून आले. सापळा कारवाईदरम्यान आरोपीला तक्रारदाराचा संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत २०१८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उप अधीक्षक एस. व्ही.शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एन.बी बोराडे व चमूने पार पाडली.

टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी