विदर्भातही वाशिम जिल्ह्याच्या जवळच अकोला जिल्हा आहे. पूर्वेकडे अमरावती व पश्चिमेकडे बुलडाणा जिल्हा आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये कमी- अधिक प्रमाणात स्थिती सारखी असून, भयावह आहे. ही परिस्थीती नियंत्रणाकरिता प्रयत्न सुरूच आहेत; परंतु यामध्ये राज्यामधील २९ लक्ष ४८ हजार ८८६ दिव्यांगांना पुरेशा व आवश्यक सुविधा पुरविण्याकडे फारसे लक्ष जात नाही. त्यांच्याकडे मोठ्या लोकवस्तीच्या नागरी भागामध्ये दिव्यांगांना चाचणीकरिता जाणे, लसीकरण करण्याकरिता जाणे, सुविधा देणे, हे कार्य होत आहे. तथापि राज्यातील दूर, दुर्गम भागातील गावांमधील छोट्या शहरामध्ये व अविकसित जिल्हा मुख्यालयामध्ये दिव्यांगांची कोरोना चाचणी व लसीकरण करण्याकरिता केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता शासन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी, तसेच विशेष केंद्र उघडावे, याबाबत प्रशासन व आरोग्य यंत्रणेला आवश्यक निर्देश देण्यात देऊन दिव्यांगांच्या आरोग्याचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दिव्यांगांच्या कोरोना चाचणीची विशेष व्यवस्था करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:42 AM